नंदुरबार (प्रतिनिधी) – येथील इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशची शिवजयंती उत्सव समिती नुकतीच गठीत करण्यात आली. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी ऍड.मजहरोद्दीन शेख, उपाध्यक्ष अजिम बागवान, शंकर जाधव तर सचिवपदी प्रताप सोनवणे यांची यांची निवड करण्यात आली.
इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांच्या अध्यक्षखाली १९ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर नुकतीच बैठक पार पडली. यावेळी शिवजयंतीनिमित्त मतिमंद शाळेत विद्यार्थ्यांना मिठाई व खाऊ वाटप तसेच छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे अभिवादन कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी सर्वानुमते शिवजयंती उत्सव समिती २०२५ गठीत करण्यात आली. उर्वरित कार्यकारणीत संघटकपदी काशिनाथ वळवी, कोषाध्यक्ष रियाज कुरेशी, सल्लागार डॉ.एम.ए.खान, सदस्यपदी अजिम पिंजारी, आप्पा वाघ, राहुल आखाडे, वसीम शेख आदींची निवड करण्यात आली. शिवजयंती सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेवून आणि हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येईल, असेही सर्वानुमते ठरविण्यात आले. बैठकीस रघुनाथ राजपूत, वनराज भोई, रोहन मोरे, अनिल भोई, शाकीर बागवान, इरफान खाटीक, छन्नु पठाण, सैय्यद मकसुद, तौफीक पठाण आदी उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!