30 भाविक मध्य प्रदेशातून गावाकडे रवाना, गावात स्वागताची जय्यत तयारी!

चिंचविहिरे (जि. अहिल्यानगर) प्रतिनिधी, शंकर कवाने.

श्रद्धा, भक्ती आणि आईच्या आशीर्वादाने प्रेरित होऊन चिंचविहिरे गावातील तरुणांनी हाती घेतलेला एक भव्य धार्मिक उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

राजूभाऊ शेटे मित्र मंडळ, चिंचविहिरे व हर हर महादेव ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजाभवानी मातेची ज्योत घेऊन वैष्णोदेवीकडे पायी यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत गावातील २५ ते ३० कार्यकर्त्यांचा सहभाग असून भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा जत्था पंजाब / जम्मू मार्गे वैष्णोदेवी येथून ज्योत घेऊन निघाला असून सध्या मध्य प्रदेश मध्ये पोहोचला आहे. वाटेत कुठेही कोणतीही अडचण येऊ नये आणि सर्व मित्र मंडळ सुखरूप चिंचविहिरे गावात पोहोचावे यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून प्रार्थना केली जात आहे. यामध्ये चिंचविहिरे गावातील भाविक योगेश नारकर यांचा विशेष सहभाग असून त्यांनी पायी पदयात्रा करत पवित्र ज्योत आणण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ यात्रा नसून श्रद्धेचा जागर असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

या भक्तिमय सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानी माता आणि जम्मूच्या वैष्णो देवी माता या दोन्ही शक्तीपीठांचा संगम या यात्रेतून घडत आहे. ज्योत गावाकडे येत असल्याची बातमी समजताच संपूर्ण चिंचविहिरे गावात आणि पंचक्रोशीत स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. गावकऱ्यांमध्ये “जय माता दी” आणि “जय तुळजाभवानी” चा जयघोष घुमत आहे.

संपूर्ण गावातून या भाविकांचे हार्दिक स्वागत करण्यात येणार आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!