जळगाव : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मान्यताप्राप्त शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध ८ मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी विद्यार्थ्यांची यादी मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषद, जळगाव यांच्या वेबसाईट (zpjalgaon.gov.in) वरिल एसएसपीएल (SSPL) लिंकव्दारे ऑनलाईन पध्दतीने गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे दि.१५/०२/२०२५ पर्यंत सादर करावी. असे आवाहन योगेश पाटील, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग जळगाव यांनी केले आहे.

योजनांची नावे- विजाभज विमाप्र प्रवर्गातील ई. ५ वी ते ७ वी मुलींना मॅट्रिक पूर्व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, लाभाची रक्कम (वार्षिक र. रू.)- २५००/-, विजाभज विमाप्र प्रवर्गातील ई. ८ वी ते १० वी मुलीना मॅट्रिक पूर्व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, लाभाची रक्कम (वार्षिक र. रू.)- ३०००/-, इमाव प्रवर्गातील ई. ५ वी ते ७वी मुलीना मॅट्रिक पूर्व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना. , लाभाची रक्कम (वार्षिक र. रू.)- २५००/-, इमाव प्रवर्गातील ई. ८ वी ते १० वो मुलींना मॅट्रिक पूर्व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, लाभाची रक्कम (वार्षिक र. रू.)- ३०००/-, १ ली ते १० वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज प्रवर्गातील विदयार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत सरकार मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना, लाभाची रक्कम (वार्षिक र. रू.)- ई. १ ली ते ८ वी १०००/-, ई. ८ वी ते १० वी १५००/- इ. १ ली ते १० वी मध्ये शिकणाऱ्या इमाव प्रवर्गातील विदयार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना. लाभाची रक्कम (वार्षिक र. रू.)- ई. १ ली ते १० वी १५००/- (अनिवासी) ई. ३ री ते १० वी ५५००/-(निवासी).

माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विदयार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना. लाभाची रक्कम (वार्षिक र. रू.)- ई. ५ वी ते ७ वी २००/-, ८ वी ते १० वी ४००/- माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विदयार्थ्यांना शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क शिष्यवृत्ती योजना. लाभाची रक्कम (वार्षिक र. रू.)- ४०५ या शिष्यवृत्ती योजनेकरिता १) मान्यताप्राप्त शाळेतील विजाभज प्रवर्गातील विदयार्थीनी असावी. २) उत्पन्नाची अट लागू नाही. ३) उपस्थिती नियमित असावी ४) ही योजना गुणवत्ता शष्यवृत्ती योजने व्यतिरिक्त राहील. अशा काही अटी व शर्ती आवश्यक असणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!