मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

जालना : दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी मित्र गजानन रामनाथ उगले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले बेमुदत उपोषण सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी सहाव्या दिवशीही सुरू होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी १५ सप्टेंबरपासून उगले यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे. १२ प्रमुख मागण्यांवर प्रशासनाकडून उत्तराची प्रतीक्षा असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.

शेतकऱ्यांच्या १२ प्रमुख मागण्या

१) मोसंबी फळपिकासाठी प्रति हेक्टर १ लाख रुपये भरपाई द्यावी.

२) २०२५ रब्बी पीकविमा मंजूर करावा.

३) जालना जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करावा.

४) ऊस उत्पादकांना प्रति टन १ हजार रुपये वाढीव दर द्यावा.

५) प्रलंबित जलसिंचन प्रकल्प पूर्ण करून दुरुस्ती करावी.

६) २०२६ खरीप पीकविमा मंजूर करावा.

७) जलसिंचन प्रकल्पांची दुरुस्ती करून ते पूर्ण करावेत.

८) जायकवाडीच्या कालव्यात दुरुस्ती करावी.

९) प्रलंबित गावांना स्वतंत्र जलसिंचन आराखडा द्यावा.

१०) जलसिंचनासाठी ७० टक्के निधी खर्च करावा.

११) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे.

१२) २०१२ ते २०२५ या कालावधीतील कर्जमाफी वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन १ लाख रुपये प्रोत्साहन रक्कम द्यावी.

दरम्यान, आंदोलनस्थळी शेतकरी, महिला व युवकांची उपस्थिती वाढत असून पोलिस बंदोबस्तात आंदोलन सुरू आहे. मागण्यांवर शासन व प्रशासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!