घनसांगवी प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे

बाचेगाव सज्जाचे तलाठी ए. बी. शिंदे यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तलाठ्यांच्या कारभाराबाबत विविध तक्रारी करत शेतकरी व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी धरणगाव तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर केले.

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध साबळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा, पीकपाणी नोंद, वारस नोंद तसेच इतर महसूलविषयक कामांमध्ये कथितरित्या हेतुपुरस्सर विलंब केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून त्यांचा वेळ व आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

शेतकऱ्यांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत तसेच तलाठी ए. बी. शिंदे यांच्या कारभाराची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

तलाठी ए. बी. शिंदे यांची तातडीने बदली करावी.

शेतकऱ्यांच्या प्रलंबित कामांची त्वरित पूर्तता करावी.

तलाठ्यांच्या कारभाराची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी.

मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे तहसील प्रशासनाला देण्यात आला आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!