विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
जामनेर : भुसावळ येथून लोहारा येथे जाणारी बस जामनेर बसस्थानकावर आली असता, बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून, बसस्थानक परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे संशयित चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जामनेर बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बसस्थानक परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे
