जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील
आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्याच्या उद्देशाने आज चोपडा पोलीस स्टेशन येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवेरे साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी मा. एसपी श्रीकांत दिवेरे साहेब यांचा सत्कार करून त्यांचे हार्दिक स्वागत केले.

बैठकीत गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून शांतता, सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा उत्सव म्हणून साजरा व्हावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन देण्यात आले.

“शिस्त पाळूया, प्रशासनाला सहकार्य करूया आणि चोपड्याचा गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करूया!”
