विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

नाशिक : समर्थ नगर परिसरातील व्यावसायिक श्रीकांत मधुकर कुलकर्णी यांच्या धात्रक फाटा येथील रसबिहारी रोड परिसरातील सुमारे ८ हजार ६२५ चौ. मीटर मोक्याच्या जमिनीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे कब्जा करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सद्दाम बाबू शेख, लता भिका बडे आणि राजाराम केशव गटकळ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कुलकर्णी यांनी संबंधित जमिनीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती ले-आउट विकसित करण्याचे काम सुरू केले होते. मार्च २०२५ मध्ये ते मुलासह जागेवर गेले असता संशयितांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीवर कब्जा केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर जागा मोकळी करण्यासाठी कुलकर्णी यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, कुलकर्णी यांना जमिनीवर पाहून त्यांच्या अंगावर पाय ठेवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच खंडणीतील एक लाख रुपये काढून घेतल्याचा आणि उर्वरित रक्कम न दिल्यास कुटुंबाला संपविण्याची तसेच खोट्या अॅट्रॉसिटी गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या त्रासाला कंटाळून कुलकर्णी यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली. आडगाव पोलिसांनी सद्दाम शेख, लता बडे आणि राजाराम गटकळ यांच्याविरोधात बेकायदेशीर घुसखोरी, जबरदस्तीने खंडणी उकळणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, मारहाण व जीवे मारण्याची धमकी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!