विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

जळगाव शहरातील विश्वकर्मा नगर परिसरातील रामेश्वर कॉलनीत बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४५ ते ४६ तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब घर बंद करून बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या कुलपाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली जात असून, चोरीला गेलेल्या ऐवजाचा नेमका तपशीलही तपासण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, चोरट्यांना लवकरच जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!