एकरक्कमी परतावा (OTS) योजना 

        जळगाव (जिमाका) –  महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरजू लोकांना स्वंयरोजगारासी कर्ज वितरीत करण्यात आले आहे. कर्ज घेतलेल्या लाभार्थीना कर्ज परतफेडीसाठी विहित मुदत देण्यात येते. विहित मुदत संपल्यानंतर  देखिल बऱ्याच लाभार्थीनी महामंडळाकडे शिल्लक रकमेची परतफेड अद्याप केलेली नाही. थकीत कर्ज वसुलीसाठी सर्व वैधानिक प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येत आहेत.

         ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!