अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने.

राहुरी, आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून समाजाच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देण्याच्या उद्देशाने एकलव्य आदिवासी आघाडी व आदिवासी बचाव समितीच्या महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राज्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांसह शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि समाजासमोरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजाच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी बर्डे, राज्य अध्यक्ष साईनाथ बर्डे, आदिवासी बचाव समितीचे राज्य सदस्य शिवाजीराव गांगुर्डे, संस्थापक सदस्य कैलासदादा माळी, महासचिव संदीप बर्डे, जिल्हाध्यक्ष भागवत भाऊ पवार, तालुका अध्यक्ष अंकुश बर्डे, संघटक प्रमोद बर्डे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच पोपट माळी, अनिल बर्डे, देविदास पवार, राधाकृष्ण बर्डे, नवनाथ शिंदे, राजूभाऊ बर्डे, शिवराज बर्डे, प्रविण बर्डे, सुनील बर्डे, सतीश बर्डे तसेच महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाबराव बर्डे यांच्यासह आदिवासी बचाव समिती व एकलव्य आदिवासी आघाडीचे महाराष्ट्रातील सदस्य उपस्थित होते.

महिला पदाधिकाऱ्यांमध्ये अलका बाई बर्डे, सताबाई माळी, चंद्राबाई बर्डे, सुरेखा राजपूत, जिजाबाई गांगुर्डे यांच्यासह वावरथ येथील सरपंच व इतर महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

“आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने आणि संघटितपणे लढा उभारू,” असा निर्धार यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रशासनाकडे पाठपुरावा करून आवश्यक त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याची भूमिकाही यावेळी मांडण्यात आली.

आदिवासी समाजाच्या हक्कांचा आवाज बुलंद करण्यासाठी राज्यभर संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!