जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
जळगाव शहरातील विविध विकासकामांबाबत प्रशासनाकडून केवळ आश्वासने आणि कागदोपत्री मंजुरी दिली जात असून प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेले नाही, असा गंभीर आरोप नगरसेवक नितीन सपके यांनी केला आहे.

सपके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या सात महिन्यांपासून अनेक विकासकामांच्या मंजुरीचे दावे केले जात आहेत. मात्र नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
प्रशासनाने केवळ कागदोपत्री मंजुरी दाखवून विकासाचा आभास निर्माण करू नये. मंजूर कामे तातडीने सुरू करून पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा नागरिकांच्या सहकार्याने तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
नगरसेवक सपके यांच्या आरोपांमुळे शहरातील रखडलेल्या विकासकामांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
