जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.

लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई सचिन पाटील यांनी आज नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आढावा बैठक आयोजित केली. नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या या बैठकीत नगरपरिषदेच्या सर्व विभागप्रमुख व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती सादर केली.

बैठकीत प्रत्येक विभागाकडून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत स्पष्ट व कठोर सूचना देण्यात आल्या. नागरिकांना दर्जेदार, वेळेवर व पारदर्शक सेवा मिळावी यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले. विकासकामांमध्ये गतिमानता आणणे व गुणवत्ता राखणे याबाबतही विशेष भर देण्यात आला.

या बैठकीस उपनगराध्यक्ष पंकजभैया बोरोले, नगरसेवक अमोलभाऊ पाटील, नगरसेवक दीपक आबासाहेब पाटील तसेच उपमुख्याधिकारी मिसर साहेब उपस्थित होते.

नगराध्यक्ष सौ. नम्रता ताई सचिन पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कामे वेळेवर, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. नगरपरिषदेच्या कामकाजात अधिक गती व कार्यक्षमता आणण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावे, असे त्यांनी आवाहन केले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!