जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण :
श्री संत ज्ञानेश्वर पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथील इको क्लबच्या वतीने “पारंपरिक ऊर्जा स्त्रोत वाचवा” या विषयावर जनजागृती अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध संदेशफलक हातात घेऊन कोळसा, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू यांसारख्या पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले.

“ऊर्जा वाचवा – भविष्य घडवा”, “इंधन बचत हीच राष्ट्रसेवा”, “वीज वाचवा – पर्यावरण वाचवा” अशा प्रभावी घोषणांद्वारे विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये ऊर्जा बचतीबाबत जागरूकता निर्माण केली. तसेच सौर ऊर्जा, पवन ऊर्जा व बायोगॅस यांसारख्या स्वच्छ आणि अपरंपरिक ऊर्जा स्रोतांचा अधिकाधिक वापर करण्याचा संदेशही दिला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संवर्धनाची जाणीव निर्माण झाली तसेच पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने ऊर्जा बचतीची सवय अंगीकारावी, असा संदेश देण्यात आला. उपक्रम विद्यालयातील इको क्लबच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
