
कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव.
यातील आरोपी धीरज राजेश शर्मा वय 22 राहणार जगताप नगर कोल्हापूर. यास ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, करवीर पोलीस ठाण्याकडील चोरीस गेलेली मोपेड घेऊन कळंबा तलाव ते गिरगाव गावाकडे जाणारे रोडवर येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याप्रमाणे मा पोलीस निरीक्षक सो किशोर शिंदे यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने तेथे कारवाई करणे बाबतचा आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी कळंबा तलाव ते गिरगाव जाणारे रोडवर असलेल्या सदा दौलत पार्क येथील सदा दौलत डेव्हलपर्स कळंबा नावचे बोर्डाच्या आजूबाजूच्या परिसरात सापळा लावला, व तेथून त्याला ताब्यात घेतला.त्यास त्यांचे नाव व पत्ता विचारता त्याने वरील प्रमाणे नाव सांगितले, त्याने कब्जात असलेल्या टीव्हीएस मोपेडच्या कागदपत्राबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता तो समाधानकारक माहिती देत नसल्याने त्यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सदरची टीव्हीएस कंपनीची मोपेड ही अंदाजे सहा ते सात महिन्यापूर्वी महाडा कॉलनी पाचगाव येथून एका घराचे दारातून चोरी केल्याचे सांगितले.

त्याबाबत करवीर पोलीस ठाण्यास गुरनं 461/ 2024 भादविस कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच त्यास पोलीस ठाण्यास घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने आणखीन एक एक्सेस मोपेड ही अंदाजे सहा महिन्यापूर्वी टिंबर मार्केट कमान ते गवत मंडई जाणारे रोडवर असलेल्या जलाराम स्वा मिल प्लायवूड दुकानासमोर रोडवर लावलेली होती तिची चोरी केल्याचे सांगितले व ती तो राहत असलेल्या जगताप नगर येथे त्याच्या घराजवळ लावलेली असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी तेथून एक्सेस मोपेड जप्त केली आहे. सदर आरोपी यास मा कोर्टात हजर केले असता त्यास कोर्टांनी म क रिमांड मंजूर केला आहे. सदर आरोपी धीरज राजेश शर्मा याचे कडून करवीर पोलीस ठाणे व जुना राजवाडा पोलीस ठाणे कडील असे दोन मोपेड चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. किशोर शिंदे, पोलीस अमलदार रणजीत पाटील, सुजय दावणे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव, अमोल चव्हाण, विजय पाटील, प्रकाश कांबळे, अक्षय पवार यांनी सहभाग घेतला.
