जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

घनसावंगी-अंबड रस्त्यावरील स्टील व फर्निचरच्या दुकानाचे शटर उचकावून चोरट्यांनी दोन लाख ९४ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

सदर घटना बुधवारी (ता. ८) पहाटे शहरात घडली. चोरट्यांनी दुकानातील तांबे व पितळेची भांडी, एलईडी टीव्ही, गॅस शेगडी तसेच रोख आठ हजार रुपये, असा एकूण २ लाख ९४ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून कारमधून पसार झाले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी दुकानाचे मालक शुभम सतीश जैन (वय २७, रा. घनसावंगी) यांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अलीकडे जिल्हाभरात चोरीचे घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!