भुसावळ प्रतिनिधी :

मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार संतोष शेलोडे यांचा भुसावळ येथे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या या निवडीमुळे भुसावळ शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून ही शहरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

जिल्हा उपाध्यक्ष हमीद शेख यांच्या कार्यालयात आयोजित सत्कार समारंभात संतोष शेलोडे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी पत्रकार रऊफ सर, फिरोज तडवी, टाईम शेख (उर्फ बाबू), अब्दुल नाजीम कादरी, अबुजर शेख, अमृद्धीम शेख, साजिद पेंटर, तसेच बसेरा फाउंडेशनच्या अध्यक्षा फरजाना शेख यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांनी संतोष शेलोडे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!