जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

पाचोरा शहरात ८ जुन रोजी रात्रीच्या सुमारास प्राॅप्रटीच्या वादावरुन शाब्दिक चकमक होवुन या वादाचा परिणाम थेट खुनात होवुन सख्ख्या भावाच्या शालकाचा खुन झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी मारेकरी स्वत हुन पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.

या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार पाचोरा शहरातील संतोष हरलाल कानडे (वय – ५५) हिंद आॅईन मिल जवळ सख्ख्या भावाच्या शालकास त्याचे भावाचा शालक यांचेशी घराच्या आर्थिक व्यवहारा वरुन वारंवार वाद सुरू होते‌, या घटनेचा थेट परिणाम खुनात होवुन ८ जुन रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शहरातील जामनेर रोडवरील कन्या शाळेजवळ संतोष कानडे याने दिपक प्रकाश कानडे (वय – ४०) कोंडवाडा गल्ली, ता. पाचोरा यास चाकुने भोसकुन खुन केल्याची घटना घडली आहे‌. घटनेनंतर संतोष कानडे हा स्वतःहुन पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये मयत दिपक कानडे यांच्या बहिनीच्या फिर्यादीवरून संतोष कानडे यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढचा तपास पाचोरा पोलीस स्टेशन करीत आहे .

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!