
चोपडा प्रतिनिधी
राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती चोपडा येथे उत्साहात सामाजिक कार्यकर्त्या कोमल ताई पाटील यांच्या नेतृत्वात पर पडली, यावेळी कोमलताई पाटील यांच्या चोपडा तालुक्यातील सर्वच सहकारी महिला यांनी आवर्जून मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून नारी शक्ती चे दर्शन घडवून आणले.
या प्रसंगी कोमल ताई आणि सहकारी महिला यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, आद्यकवी श्री वाल्मीक ऋषी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महा मानवांना औक्षण केले, त्यानंतर योगेश पाटील यांनी राजमाता यांना तसेच मन्सूर तडवी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माल्याअरपण करून मानवंदना दिली.
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती चे औचित्य साधून या दिवशी शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महिला आघाडी संघटनेचे संचालक तथा राष्ट्रीय संघटक पदी नियुक्ती झालेले श्री योगेश पाटील, जळगांव यांचा सत्कार करण्यात आला, आणि त्याच प्रसंगी कोमल ताई पाटील यांचे महिलांसाठीचे सामाजिक कार्य बघता शिवतेज महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली, आणि महिलांचे कार्य पार पाडण्यासाठी तत्पर राहून जास्तीत जास्त कार्य करत राहावे ही अपेक्षा सर्व महिला नी व्यक्त करून दाखवली.
सामाजिक कार्यकर्त्या कोमल ताई पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे, तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेचे संचालक तथा राष्ट्रीय संघटक श्री. योगेश पाटील, आणि संघटनेचे खानदेश विभाग कार्याध्यक्ष मन्सूर तडवी यांना आमंत्रित करण्यात आले होते, यावेळी शिवतेज महिला आघाडी संघटनेच्या जळगांव जिल्हा उपाध्यक्ष सौ. स्वप्नाली पाटील यांच्या सह मोठ्या प्रमाणात चोपडा तालुक्यातील महिला यादेखील उपस्थित होत्या.
