प्रती

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने ५१ अल्पभूधारक शेतकऱ्यांना कपाशी लागवडीसाठी बि-बियाणे तसेच “शंभू गाथा” पुस्तकाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून शेतीसाठी प्रोत्साहन देणे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे हा होता.

या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेती विकासासाठी संघटना नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास दिला. कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, युवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धर्मवीर छावा संघटना समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबवत असून भविष्यातही शिक्षण, शेती व सामाजिक क्षेत्रात असेच उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश उगले पाटील यांनी दिली यावेळी धर्मवीर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश उगले पाटील मराठवाडा संपर्कप्रमुख अंकुश सकुंडे, शेतकरी आघाडी मराठवाडा अध्यक्ष सूर्यप्रकाश जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख सतीश देवखळे, तसेच पंचक्रोशीतील शेतकरी बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!