कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव.

*पोलीस वर्धापन दिन- सप्ताहाचे* औचित्य साधून करवीर पोलीस ठाणे कडून गेल्या आठवडाभर विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यास भेट, तसेच पोलिसांची शाळा, महाविद्यालयांना भेटी असे कार्यक्रम सुरू आहेत.

दि. 06.01.2024 रोजी 19.30 वा. ते 21.15 वा. दरम्यान करवीर पोलीस ठाणे हद्दीतील क्रांतीसिंह नाना पाटील नगर,कोल्हापूर येथील चौकात जाऊन पोलीस निरीक्षक श्री किशोर शिंदे करवीर पोलीस ठाणे यांनी *ज्येष्ठ नागरिकांची भेट* घेतली, त्यांच्या अडी- अडचणी समजावून घेऊन सुसंवाद साधून पोलीस -जनता संबंध आणखीन दृढ होण्याच्या दृष्टीने चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. ज्येष्ठ नागरिकांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या… यापूर्वी पोलीस म्हटले की भीती वाटायची.. परंतु आता पोलीस मित्र असल्याचे जाणवते, त्यामुळे फार मोठा आधार मिळतो.. अशी भावना व्यक्त केली…. सामाजिक विधायक उपक्रम, प्लास्टिक मुक्ती, जुने कपडे दान.. वगैरे मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली. पोलीस निरीक्षक श्री किशोर शिंदे यांनी आपण सर्व वेगवेगळ्या विभागातून, सेवानिवृत्त झाला आहात, तरीदेखील आपण चांगले उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण करत आहात. ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास त्यांनी पोलिसांची मदत घ्यावी.. आम्ही सर्वतोपरी मदत करू. स्वच्छंदी जगण्यासाठी मैत्री हे एक साधन असून सर्वांनी मैत्री जोपासावी, व व्यक्त व्हावे.. असे सूचित केले…

सर्व ज्येष्ठ नागरिकांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले,

पोलीस दलाकडून अचानक भेट देऊन घेतलेल्या सुसंवाद चर्चासत्राचे कौतुक करून त्यांच्याकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांबाबत पोलीस दलाचे आभार व्यक्त केले. पोलीस वर्धापन दिन सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या..

यावेळी भागातील ज्येष्ठ नागरिक श्री गजानन विभुते, श्री चंद्रकांत बागडी, श्रीनिवास नलवडे, श्री सदाशिव पुंडे ,अरुण पाटील, श्री सुरेश गुरव श्री रमेश गुरव, श्री राजाराम खोंद्रे, श्री शंकर टिकुगुडे सहा.फौजदार श्री. माळी, पोलीस अंमलदार अविनाश पोवार हजर होते…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!