राहुरी प्रतिनिधी, भरत नजन.

राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या पाच विद्यार्थ्यांनी काल दिनांक 8 जानेवारी रोजी शाळेत जाण्यासाठी घरून निघाले होते परंतु ते विद्यार्थी शाळेत न जाता त्यांनी शाळेला दांडी मारून डिग्रस परिसरातून जाण्याऱ्या मुळा धरण्याच्या कॅनॉल येथे पोहचले त्यांना पोहण्याचा मोह आवरला नसल्याने ते कॅनॉलच्या पाण्यात उतरले परंतु यापैकी काही तरुणांना पोहता येत नसल्याने ते वाहत्या पाण्यात बुडायला लागल्याने आरडा ओरडा करू लागले. त्यांचा आवाज ऐकून काही अंतरावर असलेले भानुदास रोडे, प्रशांत गावडे व अजय गावडे यांनी पाटाकडे धाव घेऊन पाण्यात उड्या मारून चार विद्यार्थ्यांना बाहेर काढले.विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या काही सुरक्षारक्षकांसह घटनास्थळी पोहचले त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व सुरक्षा रक्षक यांनी पाण्यात बुडालेल्या तरटे नामक विद्यार्थ्याचा शोध घेण्यास सुरवात केली परंतू तो तरुण पाण्यात खोलवर गेल्याने व पाण्याची गती जास्त असल्याने शोध घेणे कठीण झाले होते.

या घटनेची माहिती समजताच माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे हे घटना ठिकाणी येऊन त्यांनी ताबडतोब मुळाधरणाच्या अभियंता सायली पाटील यांना संपर्क करून पाण्याचा वेग कमी करण्यासाठी सांगितले. त्यानंतर काल रात्री उशिरापर्यंत सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे, राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सानप व स्थानिक नागरीक व सुरक्षा कर्मचारी रात्रभर या तरुणाचा शोध घेत होते.परंतु आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शोध घेत असताना त्या तरुणाचा मृतदेह डिग्रस परिसरातील गावडेवस्ती जवळ कालव्यामध्ये एका पाण्यात लोखंडी अँगलाला अडकलेल्या स्थितीत आढळला असता त्यास मृतदेहास स्थानिक नागरीक म्हाळु हाळनोर, राहुल गायकवाड, अविनाश भिंगारदे, सोनू कोकाटे अक्षय गोसावी यांनी पाण्यात उतरून बाहेर काढले. तो तरुण विद्यापीठ येथे कृषी सहाय्यक पदावर सेवेत असलेले श्रीपती तरटे यांचा मुलगा असून या तरुणाचा मृतदेह पाहताच या तरुणाच्या कुटुंबीयांनी टोह फोडला होता. या घटनेमुळे विद्यापीठ परिसर व सावित्रीबाई फुले विद्यालयात शोककळा पसरली आहे.

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!