जळगाव, (जिमाका वृत्तसेवा):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव व जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६८ वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन दि. ०५ ते ०८ जानेवारी, २०२५ या कालावधीत श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेत भारतातील २० राज्य सहभागी होत असुन १७ वर्षे आतील मुलांचे २० संघ व १७ वर्ष जातील मुलींचे १९ संघ असे एकुण ३९ संघांतील एकुण ६२४ खेळाडू, प्रत्येक संघासोबत १ व्यावस्थापक व १ फ्रीडा मार्गदर्शक असे एकूण ७८ संघ व्यावस्थापक व क्रीडा मार्गदर्शक, ४० पंच तसेच संघटनेचे पदाअधिकारी व शासकीय अधिकारी / कर्मचारी असे एकूण ९०० व्यक्तीं सहभागी होत आहेत. या स्पर्धेत भारतातील नामवंत सॉफ्टबॉल खेळाडू सहभागी होत असून या खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी जळगाव जिल्हयातील शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थी / खेळाडू व जळगांवातील नागरीकांना स्पर्धेच्या माध्यमातुन उपलब्ध होणार आहे.

६८ वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ०५ जानेवारी रोजी सायंकाळी ०४.०० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम दि. ०८ जानेवारी रोजी सायंकाळी ०४.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तर  स्पर्धा दि. ०५ ते ०८ जानेवारी या कालावधीत  सकाळी ८.०० ते संध्याकाळी ०६.०० वा. पर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत.  जिल्हयातील सर्व शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थी / खेळाडूं, क्रीडा संघटना, नागरीक व क्रीडा प्रेमी यांनी सॉफ्टबॉल या खेळांच्या स्पर्धा पाहण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा रविंद्र नाईक यांनी केलेले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!