जळगाव, (जिमाका वृत्त) :- विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग नाशिक यांच्यामार्फत लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण 13 जानेवारी ते 26 मार्च, 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती माधव थैल , सहाय्यक संचालक, (प्रशिक्षण) लेखा व कोषागारे, नाशिक विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या प्रशिक्षणामध्ये लेखा, वित्त व शासनाच्या विविध संगणक प्रणालींचा समावेश असून त्या विषयीचा निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी, नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर, नंदुरबार यांच्या जिल्हा कोषागार कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे.

या प्रशिक्षणासाठी इच्छुकांना प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचारी यांना प्रशिक्षण सक्तीचे केले आहे. प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. ज्यांना पूर्णवेळ कर्मचारी पाठविणे शक्य नाही त्यांना विशिष्ट मोडयुल्सना प्रवेश घेण्याची अनुमती देण्यात येणार आहे.

नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांना त्यांच्याकडील लिपीक वर्गीय कर्मचारी यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे आवाहन श्री. महेश मुरलीधर बच्छाव, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी केले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!