धुळे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद बोरसे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय जळगाव अंतर्गत कामगार कल्याण भवन, दोंडाईचा येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगार मेळावा आयोजन करण्यात आले. या मेळावा मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद परदेशी, आगार प्रमुख दोंडाईचा हंसराज ठाकरे, नरेंद्र भाबड, युनियन प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.

हा कार्यक्रम राज्य परिवहन महामंडळ दोंडाईचा आगार या ठिकाणी घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय दिनाचे महत्त्व व मराठी भाषा संवर्धन इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात आले व अल्पोपहार व चहापानाचा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी मंडळातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
