जळगाव, दिनांक 2 जानेवारी (जिमाका वृत्त) : जळगावातील मोहाडी येथील महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथे डॉ. रोहन पाटील (एम एस सर्जन) जळगाव यांनी दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स (Appendix) ही गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया अगदी यशस्वीपणे पार पाडली.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने भूलतज्ञ डॉ. प्राची सुरतवाला यांनी रुग्णाला योग्य भूल देऊन अति जोखमीचे हे ऑपरेशन पार पाडले व रुग्णालयातील सहाय्यक अधिसेविका श्रीमती. संगीता शिंगारे, श्रीमती. रूपाली जोशी, श्रीमती. नम्रता नागापूरकर, श्रीमती. दिपाली बढे यांनी व शस्त्रक्रियां विभागातील सर्व कर्मचारी यांनी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी यासाठी प्रयत्न केले.

मोहाडी येथील महिला व बाल रुग्णालयात दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया जसे गर्भपिशवी काढणे, अपेंडिक्स काढणे, हर्निया दुरुस्ती या सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामुल्य होतात तरी जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसंबधी मदतीसाठी श्री. चेतन परदेशी ९०६७५३१९२३ व श्री. राहुल पारचा ९६७३६३९७४१ यांना संपर्क साधावा असे आवाहन डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी जिल्ह्यातील रुग्णांना केलेले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!