श्रीशिवाजीनगर, राहुरी :

(अहील्यानगर प्रतिनिधी:- शंकर कवाने)

नववर्षाच्या सुरुवातीलाच राहुरी पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार शेळके, ठोंबरे, नाईक बागुल, कॉन्स्टेबल धायगुडे आणि होमगार्ड यांच्या टीमने श्रीरामपूर नाका आणि राहुरी फॅक्टरी भागात बिना नंबर प्लेटच्या वाहनांविरुद्ध धडक मोहीम राबविली आहे.

या मोहिमेचा उद्देश गुन्हेगारांना पकडणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे हा आहे. 2023 मध्ये 117 टू व्हीलर चोरीच्या घटनांची नोंद राहुरी पोलीस स्टेशनमध्ये झाली होती. मात्र, पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे 2024 मध्ये या घटनांमध्ये 45 ने घट झाली आहे.

पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे यांनी सांगितले की, “गुन्हेगार बहुतेक वेळा विना नंबर प्लेटच्या गाड्या वापरतात. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करून गुन्हेगारी रोखता येईल. नागरिकांनी अशा प्रकारांच्या घटनांबाबत सतर्क राहावे व पोलिसांना सहकार्य करावे.”

पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे. 2025 हे वर्ष गुन्हेगारी कमी करणारे ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!