जळगांव प्रतिनिधी :- निलेश खैरनार.
जळगाव येथील चर्मकार विकास संघातर्फे मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता सिव्हिल हॉस्पिटल समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सुरवातीस श्री.बाबुराव वाघ, श्री राजुभाऊ मोरे यांनी प्रार्थना म्हटली. या प्रसंगी श्री.वानखेडे गुरुजी हाउसिंग सोसायटी चे अध्यक्ष श्री वसंतराव नेटके, चर्मकार विकास संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.विश्वनाथ सावकारे, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री संजय वानखेडे सर, प्रदेश सहसचिव ॲड.श्री.चेतन तायडे, ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष श्री.प्रकाश रोजतकर, जिल्हाध्यक्ष डॉ.अर्जुन भारुळे, कार्याध्यक्ष ॲड.श्री.राजेश वाडेकर, उपाध्यक्ष श्री गजानन दांडगे सर, श्री. ज्ञानदेव भारुडे, श्री.पंकज तायडे. श्री.आत्माराम चिमणकर, श्री.श्रावण निंभोरे, श्री.कैलास वाघ सर, श्री.विजय राखुंडे, संदीप ठोसर सर, डॉ.दिलीप तायडे, सुजल सावकारे, ॲड.श्री.मुकेश कुरिल, श्री.रवींद्र सावकारे, श्री.कुणाल तायडे, वेदांत विसपुते, डॉ.शंकरलाल सोनवणे आदी उपस्थितीत होते.

या प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करण्यात येऊन “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा मूलमंत्र अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.संजय वानखेडे सर, श्री.विश्वनाथ सावकारे यांनी परिश्रम घेतले.
