अहिल्यानगर प्रतिनिधी, राहुरी :- शंकर कवाने.

राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे आदिवासी कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज कानडगाव गाव बंद ठेवून सकल हिंदू समाज बांधवांनी एकत्रित येऊन या घटनेचा निषेध केला आहे तसेच या प्रकरणातील जिहादी आरोपीस पकडून पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर अटक करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा युवा नेते अक्षय कर्डिले यांनी दिला आहे.

कानडगाव येथील आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीचे गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी फुस लावून अपहरण करण्यात आले अद्यापही या मुलीचा शोध न लागल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून आज गाव बंद ठेवत या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले म्हणाले की, जिहादी वृत्तीचे प्रमाण वाढले असून या प्रकरणातील आरोपीला पकडून मुलीचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी केली.

यावेळी एकलव्य संघटनेचे योगेश सूर्यवंशी, अहिल्यानगर भाजपा सरचिटणीस अमोल भनगडे, नानासाहेब गागरे, सोसायटीचे चेअरमन सोपानराव गागरे, माजी उपसरपंच डॉ. रवी गागरे, माजी सरपंच मधुकर गागरे, उपसरपंच राहुल गागरे, युवा तालुका अध्यक्ष बिपीन ताठे, राहुल दिघे, रोहित दिघे, भागीनाथ बेलकर , ऋषि बांगरे तसेच कानडगाव येथील महिला व ग्रामस्थ उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!