अतुल माळी, यावल (प्रतिनिधी) :

यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोळन्हावी येथील १७ वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. घटनेनंतर तिला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करीत आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलिस ठाण्याचे कर्मचारी करीत असून मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. घटनेमुळे कोळन्हावी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!