अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने

देवळाली प्रवरा शहरातून बिरोबावाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडलेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह सापडला असून सुनील बाळासाहेब तुपे (वय ३२, रा. लाख रोड, देवळाली प्रवरा) असे मृत तरुणाचे नाव असून, पट्टीच्या पोहणारे व नगपरिषद कर्मचारी यांच्या मदतीने त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

आज मंगळवारी सकाळच्या सुमारास बिरोबावाडी रस्त्यालगत संजय टिक्कल यांच्या विहिरीजवळ एक दुचाकी तसेच दुचाकीस्वाराच्या चप्पल संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी गर्दी करत राहुरी पोलिसांना माहिती दिली.

प्राथमिक अंदाजानुसार दुचाकीस्वार विहिरीत पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार खात्री करण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली. पट्टीचे पोहणारे, नगपरिषद व्यवस्थापन पथक यांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला. त्यावेळी मृतदेह काढला असता तो सुनील बाळासाहेब तुपे यांचा असल्याचे समजते.

दरम्यान, तुपे यांनी आपली जीवनयात्रा का संपवली, याबाबतचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

घटनास्थळी पोलीस प्रशासन, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!