जळगांव:- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला .ना. सा. विद्यालयात विद्यार्थांच्या क्रीडा कौशल्यांचा विकास होऊन त्यांच्यात संघभावना, खिलाडूवृत्ती, नेतृत्व गुण विकसित होऊन आत्मविश्वास वाढावा या हेतूने दिनांक 9 ते 10 जानेवारी या कालावधीत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाचे उदघाटन संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.श्री.सुशीलदादा अत्रे, यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री. अभिजीत देशपांडे, सहसचिव सौ. मीराताई गाडगीळ, समन्वयिका सौ. विजयालक्ष्मी परांजपे, तालुका क्रीडा अधिकारी डॉ. श्री. सुरेश थरकुडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप, पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे, सौ. रमा तारे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध खेळांचे संघ :- लंगडी, कबड्डी, खो -खो, बॅडमिंटन, क्रिकेट, व्हॉलिबॉल, आदी संघ, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, पंच, आदी उपस्थित होते.

या प्रसंगी सकाळ व दुपार विभागातील एकूण ६५० विद्यार्थांनी क्रीडा स्पर्धांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन आनंद लुटला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, क्रीडा विभाग प्रमुख तथा शाळेचे उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.

या स्पर्धांचे सूत्रसंचालन श्री. उमेश ढाकणे यांनी तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन श्री. उल्हास ठाकरे यांनी केले. हा दोन दिवसीय उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी परिश्रम घेत आहेत.
