मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

घनसावंगी तालुक्यातील ग्रामहसूल अधिकारी हे अनुदान, फेर कामकाज, पंचनामे इत्यादी कामाकाजात टाळाटाळ करत असले बाबत तसेच फेर घेण्यास तसेच गोरगरीब शेतकऱ्यांची आर्थिक लुट करत असल्याबाबत ग्रामामाहसूल अधिकारी यांच्या विरोधातील निवेदन भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य संघटना तालुका घनसावंगी संघटनेच्या वतीने तहसीदार घनसांगवी यांना देण्यात आले.

घनसावंगी अंतर्गत कार्यरत असलेले सर्वच ग्राममहसुल अधिकारी यांच्या फेर घेण्याकरीता अव्वाच्या सव्वा रकमेची आर्थिक मागणी करतात, हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर केला जाणार अन्यायच आहे. तसेच शेतकऱ्यांचे शेती नुकसानीचे, शेतरस्त्याच्या पाहणी, पंचनामा व इतर कोणत्याही कारणास्तव पंचनामा करण्यास ग्राममहसुल अधिकारी मिटींग आहे, आज येतो-उद्या येतो, मला एकच गाव नाही असे म्हणुन कामकाज करण्यास टाळाटाळ करत आहे. तसेच अनुदानापासुन वंचीत शेतकऱ्यांना व्हीके नंबर उपलब्ध करुन न देणे, शेतातील पिकांचा तसेच फळपिकांचा प्रत्यक्ष पंचनामे न करता पुढाऱ्यांची तसेच जे पैसे देईल त्यांच्या नावे अनुदान देणे अशा प्रकारची कामे करुन तालुक्यातील शेतकऱ्यांची तसेच शासनाची फसवणुक करत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी फोन केले असता उत्तर न देणे, फोन न उचलने, उचलल्यास शुल्लक कामास शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी बोलावणे अशा प्रकारची वागणुक शेतकऱ्यांना मिळत आहे. तसेच तालुक्यातील कोणतेही ग्राममहसुल अधिकारी महिण्यातील एकही दिवस सज्जेच्या ठिकाणी पुर्णवेळ हजर राहत नाही. त्यामुळे तालुक्याती बहतांश शेतकऱ्यांचे हाल होत असुन त्यांचे कोणतेही काम मार्गी लागत नाही व शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक लुट होत आहे. तसेच आणखी मागील वर्षीचे तसेच यावर्षीच्या बहुतांश शेतकऱ्यांना व्हीके नंबर देखील मिळालेले नाहीत.

तरी तालुक्यातील सर्व ग्राममहसुल अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची कामे वेळेवर तसेच नियमानुसार करण्याकरीता तसेच शेतकऱ्यांची आर्थीक लुट होऊ न देण्याबाबत त्यांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आपल्या स्तरावरुन कार्यवाही करावी नसता तारीख व वेळ ठरवुन देऊन आपल्या कार्यालयासमोर घनसावंगी तालुका संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना या प्रसंगी देण्यात आलेला आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!