जळगांव :- वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल राव जाधव साहेब यांच्या आदेशानुसार व वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता श्री अमित भाऊ तडवी यांच्या सूचनेनुसार दिनांक २२/१२/२०२५ पंचायत समिती कार्यालय जळगाव यांना दिलेल्या निवेदनावर सदरील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख व निरीक्षक श्री गोरख भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने दिनांक १/१/२०२६ रोजी दिलेल्या निवेदनावर दखल घेऊन संबंधित अधिकारी यांनी सर्व संबंधित ग्रामसेवक, सरपंच यांना, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे साहेब यांनी तत्काळ बैठकीचे आयोजन करून उपस्थित राहण्याचे सुचना दिल्या होत्या त्यां प्रमाणे आज विस्तार अधिकारी केदार आण्णा, घरकुल अधिकारी, विजय साळुंखे साहेब, दिनेश ठाकुर संबंधित गावातील ग्रामसेवक व सरपंच खेडी खुर्द येथील सरपंच तेजस कैलास चौधरी, वडनगरीगावचे उमाकांत नरेंद्र पाटील, ग्रामसेवक दिनेश देवराव आप्पा, फुपनगरी ग्रामसेविका रोहिनी मोरे, कानळदा सरपंच पुंडलिक सपकाळे, ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण, ग्रामपंचायत आप्पा सदस्य जगदीश भाऊ सपकाळे, जामोद, चोधरी, ग्रामसेवक व सरपंच दापोरा दिलिप पवार, ग्रामसेवक विटनेर ग्रामसेवक हे उपस्थित होते.

सदरील बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. काही मुद्द्यांवर स्थानिक पातळीवर प्रशासनाची हतबलता व अनास्था दिसून आली. काही गावातील विषय हे २-३ वर्षांपासून सतत विनाकारण लालफितीत अडकवून ठेवण्यात येत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. सदरील विषयावर गटविकास अधिकारी सो जळगाव यांनी संबंधित गावातील सरपंच व ग्रामसेवक यांना तातडीने कारवाई करुन आदिवासी समाजातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आदेशित केले. सदरील प्रकरणात गटविकास अधिकारी सो जळगाव यांनी लिखित स्वरूपात कोणतेही मुद्द्यांवर आश्वासन न दिल्याने दिनांक २०/१/२०२६ रोजी चे आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी जळगाव वतीने निश्चित करण्यात आले आहे. सदरील प्रकरणात सकारात्मक चर्चा झाली.

तरी वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीच्या जळगाव जिल्हा पदाधिकारी भानुदास देवसिंग भिल्ल व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते अविनाश जाधव, यशवंत गायकवाड, तसेच घरकुल लाभार्थी उपस्थित बैठकीत पार पडली.
