मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

आजच्या स्पर्धात्मक युगात जिल्हा परिषद मराठी शाळांचा शैक्षणिक गुणवत्ता दर्जा खालावत असल्याच्या चर्चांना विराम देत, जालना जिल्हातील घनसांगवी तालुक्यामधील मौजे वडीरामसगांव येथील जिल्हा परिषद शाळेने एक पाऊल प्रगतीचे टाकत नुकत्याच झालेल्या गणित विज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद वडीरामसगाव शाळेने केंद्रात तिसरा क्रमांक पटकावला असून या निम्मित माधुरी गिरी, सार्थक सातपुते, पंकज भारस्कर, शंकर गिरी, रिंकू साबळे, सारिका चांदगुडे या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले, तसेच आपल्या विद्यार्थ्यांनी अश्याच प्रकारे यश मिळवत दैदिप्यमान कामगिरी करावी यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सरपंच दत्ताभाऊ वराडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राजेश सोनवणे, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिरुध्द साबळे, मुख्याध्यापक अंगद कुमार भागवत, गणेश खेडकर, श्रीमती नाईक, श्रीमती सातपुते तसेच विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!