भुसावळ प्रतिनिधी,

स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटने अंतर्गत असलेल्या माहिती अधिकार व पत्रकार सरक्षण संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष श्री. मिलिंद सोनवणे हे मागील काही दिवसा पासून मा. मुख्याधिकारी साहेब श्री. राजेंद्र फातले आणि जिल्हाधिकारी साहेब जळगाव याना भुसावळ नगर परिषद हद्दीतील सिंधी कॉलनी, नानक नगर, नवजीवन सोसायटी परिसरात असलेल्या म्यु. घ. न. यांची घरपट्टी असेसमेंट उताऱ्या वर नमूद क्षेत्रफळ आणि आज रोजी अस्तित्वात असलेले बांधिव क्षेत्राफळ यांची डाटा एन्ट्री नुसार तपासणी व्हावी आणि बांधकाम परवानगी तपासणी करावी, बांधकाम परवानगी नुसार बांधकाम केले आहे किंवा नाही याची तपासणी व्हावी, तसेच सदर परिसरात अतिक्रमन आहे का? असल्यास संबंधित विभागास कार्यवाही करण्याचे आदेश व्हावे, तसेच सदर परीसरात व्यापार करण्यासाठी नागरिकांनी दुकानें उभारलेली आहे, त्या दुकानाची नोंद नगर परिषद तर्फे दफ्तरी घेण्यात येऊन व्यापारी दुकानें म्हणून कर वसुल करण्यात यावा, सदरचे शॉप ऍक्ट परवाना तपासणी व्हावा अशी मागणी केली होती.

परंतु संबंधित प्रशासन या मागणी कडे दुर्लक्ष करीत असल्याने निवेदन कर्ता यांनी सदर बाब मा. आयुक्त साहेब नाशिक यांना सुद्धा लेखी पत्राने कळविले आहे. उपोषण कर्ता हे दि. १४/०८/२०२५ रोजी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगाव यांनी दिलेल्या पत्रा नुसार जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणास न बसता जी. एस. ग्राउंड, कोर्ट समोर जळगाव येथे सकाळी १० वाजता बसणार आहे. असे त्यांनी दिलेल्या माहिती वरून कळले आहे. सदर उपोषण कर्त्यांची मागणी स्थानिक प्रशासनाने त्वरित मान्य केल्यास त्याचा मोठा लाभ भुसावळ नगर परिषदेस होईल व कर वसुली दंड वसुली करून शासनास इतर विकास कामासाठी निधी उपलब्ध होईल. व शहराचा विकास होण्यास मदत होईल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!