नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी.

शालेय मंत्रिमंडळ निवडणूक जि. प. शाळा मोठा कुंभारपाडा

आज दिनांक 15 /07/ 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा मोठा कुंभार पाडा येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संगणकावर ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली.

दिनांक 12 /7/2025 रोजी शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली, निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांचे फॉर्म दिनांक 14/7/2025 रोजी भरून घेण्यात आले.

दिनांक 15 /07/2025 रोजी सकाळी 11=30 मिनिटांनी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, या निवडणुकीत सहा उमेदवारांनी आपले फॉर्म भरले निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक दादासाहेब श्री काळुसिंग वळवी मतदान अधिकारी म्हणून अंगणवाडी सेविका श्रीमती संगीता गावित व श्रीमती सिंधुबाई वळवी यांनी काम पाहिले या मतदान प्रक्रियेत 52 मतदारांनी आपले मतदान नोंदविले व 12=40 मिनिटांनी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली व ठीक 1=00 वाजता निवडणूक अधिकारी व उमेदवारांसमोर निकालाची प्रक्रिया पार पाडण्यात आली व निकाल घोषित करण्यात आले.

शालेय मंत्रिमंडळात निवडून आलेले उमेदवार खालील प्रमाणे

1) राघव गावित

2) सनवी वळवी

3) कुंज वळवी

4) अन्वय वळवी

5) जसप्रीत गावित

6) सुहानी वळवी

विजय उमेदवारांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या

अशा पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक कुठलेही गालबोट न लागता शांततामय वातावरणात पार पाडण्यात आली निवडणूक प्रक्रिया यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री छात्रसिंग वळवी सहाय्यक शिक्षक श्री विशाल वळवी मुख्याध्यापक श्री किरण घरटे यांनी काम पाहिले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!