मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
घनसांगवी तालुक्यातील मौजे भेंडाळा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आर.सी.पटेकर व सरपंच यांचे पती नामे चत्रभुज सानु मुन्ने यांनी सन फेब्रुवारी 2025 पासून संगनमत करुन 15 वित्त आयोग, महिला व बालविकास या खात्यातून अंगणवाडीचे बांधकाम न करता बिले काढुन हडप केले आहेत. तसेच आज पर्यंत कधीही ग्रामसेवक गावामध्ये येत नाही. तसेच ग्रा.प. स्वनिधी मधून व अनेक विविध प्रकारच्या निधीमधून लाखो रुपयांचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला असून गावामध्ये कोणतेच काम दिसून येत नाही. गावाची त्यांनी संगनमत करुन फसवणुक केलेली आहे.

तसेच गावामध्ये कोणतीही मासिक सभा, ग्राम सभा घेतलेली नाही, ग्रा.पं. सदस्यांना कोणतीही विचारणा, माहिती न देता मनमाई कारभार केलेला आहे. तसेच ग्राम सभा झाल्याचे दाखवण्यासाठी खोट्या सह्या घेतल्या आहेत. दलित वस्ती मधील कामे असे कोणतीच कामे न करता फक्त कागदोपत्री कामे झालेली दाखवून बिले काढलेली आहेत. तसेच घनकचरा व इतर जे ही कामे केलेली आहेत ते संपुर्ण बोगस स्वरूपाची केलेली आहेत. अशी माहिती अर्जदार शरद राधाकिसन सुरासे (उपसरपंच) व इतर सर्व ग्रा.प. सदस्य मौजे भेंडाळा, ता. घनसावंगी, जि. जालना. यांनी आमच्या प्रतिनिधी यांना दिली.
तरी मा. गटविकास अधिकारी साहेबांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे. व केलेल्या भ्रष्टाचाराची शासनाची रक्कम संबंधिताकडून वसुल करण्यात यावी. नसता संपुर्ण ग्रामपंचायत सदस्य हे आत्मदहन करणार आहे, अशा अनुषंगाने निवेदन देण्यात आलेले आहे. आता गट विकास अधिकारी या विषयावर काय कारवाई करतात, या कडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
