जळगाव प्रतिनिधी:

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “जागेवर निवड संधी” या उपक्रमांतर्गत प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या विशेष रोजगार मोहिमेचे आयोजन ३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता केंद्राच्या कार्यालयात पार पडले.

उद्घाटनप्रसंगी सहायक आयुक्त संदीप गायकवाड आणि यंग प्रोफेशनल श्रीकांत लांबोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या ड्राईव्हमध्ये जस्ट डायल लि., स्टार फॅब्रिकेटर्स व वैदिक इंटरप्रायझेस यासह तीन आस्थापनांनी सहभाग नोंदवला होता. या कंपन्यांनी एकत्रितपणे ३० पेक्षा अधिक रिक्त पदांची माहिती दिली. एकूण ६५ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ६० उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. या मुलाखतींमधून १७ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली असून, २ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

या यशस्वी आयोजनामुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक गुरुवारी या कार्यालयात प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. उमेदवारांनी अशा ड्राईव्हचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि भविष्यातील संधींबाबत वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी Jalgaon Skill या फेसबुक पेजला नियमित भेट द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले.

 

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!