जळगांव प्रतिनिधी
नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट ड संवर्गात 284 पदे भरती करीता दिनांक 22/04/2025 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती, सदर भरती प्रक्रिया पुर्ण करण्याकामी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याकरिता, तसेच ऑनलाईन पध्दतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरिता आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बैंकीग पर्सोनेल सिलेक्शन) कपनीस नियुक्त केले आहे. व त्यानुसार आय.बी.पी.एस. कडून दिनांक 22/04/2025 ते दिनाक 16/05/2025 दरम्यान ऑन लाईनपध्दतीने अर्ज भरुन घेण्यात आलेले आहेत.
आय.बी.पी.एस.च्या संकेतस्थळावर यशस्वीरीत्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची दिनांक-01/07/2025 ते दिनांक 08/07/2025 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे प्रवेशपत्र/हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोदणी केलेल्या ई-मेलवर आय.बी.पी.एस. कडून पाठविण्यात येणार आहे.
सदर परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात येत आहे. (रविंद्र बिनवडे) भा.प्र.से. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे
