मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
शेतकऱ्यांसाठी सत्ताधारी आमदारांची जीभ घसरणे हे काही नवीन राहिलेले नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हे राजकारणी पुढारी निवडून येतात, यांना एकदा सत्ता मिळाली की सत्तेचा माज यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येतो, याची अनेक उदाहरणे आपण आज पर्यंत बघितलेली आहे.
जालन्याच्या परतूर मध्ये बबनराव लोणीकर यांची घसरली जीभ, गेल्या 25 वर्षात गावात जे काही आले ते लोणीकर यांनीच दिले आहे असे ते हर घर सोलर योजनाच्या कार्यक्रमाच्या जाहीर सभेत बरळले. सोशल मीडिया वर काही तरुणांनी केलेल्या पोस्ट वर बोलताना लोणीकर बोलत होते.
परंतु या सर्व घटनेचा निषेध सर्व शेतकरी बांधव करताना दिसून येत आहे त्यातच काही तीव्र प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्त शेतकऱ्यांमधून उमटून येत आहे.
तुझ्या घरून देतो का तु मायबाप शेतकऱ्याला बबनराव…
तुमच्यासारखे हरामखोर भ्रष्टाचारी राजकारणी लोक फक्त माझ्या मायबाप शेतकऱ्यांने पिकवलेले धान्य खाऊनच जगत आहात हे लक्षात असू द्या..
एका दाण्याचे हजार दाणे करणारा माझा बाप तुझ्यासारख्या भिकार राजकारण्यांना टोपल्याने वाढतो देण्याची दानत फक्त माझ्या मायबाप शेतकऱ्यांमध्येच आहे माझा बाप शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि याच जगाच्या पोशिंद्याला भिकारी संबोधित करतो, जाहीर निषेध तुझा..
शेतकऱ्यांच्या पायातील चप्पल बबनराव मुळेच आहे असे त्याचे म्हणणे आहे तर ती चप्पल लवकरच तुला व्याजासहित माझ्या तमाम मायबाप शेतकरी पुत्रांच्या माध्यमातून तुला परत केली जाईल बबनराव..
बबनराव लोणीकरचा जाहीर निषेध..
तुझ्यामुळे माझ्या बापाच्या पायात असणाऱ्या बूट चपला तुला व्याजासहीत लवकरच परत करणार..
चला तर मग आपण लवकरच बबनराव याचा उपकार फेडून टाकू आणि त्याच्या बूट चप्पल त्याला परत देण्याचा कार्यक्रम लवकरच ठेवू, अशी भूमिका आता शेतकरी घेताना दिसत आहे.
तरी मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या आमदारांना समज द्यावी की, आमदारांनी शेतकऱ्यांसाठी अशी वक्तव्य करणे अगदीच चुकीचे आहे, अशी शेतकऱ्यांमधून आशा व्यक्त होत आहे. आता तरी मुख्यमंत्री साहेब अशा घटनांना आला घालणार का? लोणीकर यांना समज देणार का? हे ही बघणे चर्चेचा विषय बनला आहे.
