मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

सरकारी अनुदान वाटपाची लाभार्थी यादी तयार करतांना भ्रष्ट तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यकांनी कळस गाठल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.जालना जिल्ह्यातील सरकारी अनुदान वाटपाच्या यादीत चक्क अहिल्या नगर,बीड आदी जिल्ह्यातील अनेक शेतकरी खातेदाराच्या नावाचा समावेश करण्यात आल्याचे समोर आले असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.ज्या खातेदारांच्या नावांचा अनुदान वाटप यादीत समावेश करण्यात आला आहे अशा लाभार्थ्यांना अनुदानाची निम्मी रक्कम देऊन निम्मी रक्कम या घोटाळ्यात समाविष्ट असणाऱ्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी लाटल्याचे देखील बोलले जात आहे.विशेष म्हणजे सरकारी अनुदान वाटपात इतक्या मोठया प्रमाणात नंगानाच घातला जात असतांना महसूल खात्यातील तालुका आणि जिल्हा पातळीवरील अधिकारी गप्प कसे होते ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!