जळगाव – येथिल वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस या संस्थे व्दारे मानेगाव येथे सरपंच,उप सरपंच यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम अतिशय उत्साहात घेण्यात आला.
      मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव येथे मार्कंडेय ऋषिंच्या मठा जवळ हे वृक्षारोपण करण्यात आले.तेथिल युवक आणि ग्रामस्थांनी झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे.
      वृक्षारोपणा साठी वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस या संस्थेच्या अध्यक्ष शांता वाणी, कोषाध्यक्ष हेमलता कुलकर्णी, नंदाताई पाटील, शालिनी पाटील,निवेदिता ताठे,कल्पना बोरसे,संध्या वाणी, उर्मिला तांबट,मिना पाटील,मिना महाजन,मंगला सोनवणे,अलका पाटील ह्या भगिनी मानेगावला गेल्या  होत्या. वृक्षारोपण प्रसंगी मानेगावच्या सरपंच लिना पाटील संभाजी पाटील ,उप सरपंच चेतना पाटील,माजी सरपंच रविंद्र पाटील,माजी पं.स.सदस्य लताबाई पाटील, पोलिस पाटील दिलीप पाटील, चंद्रकांत पाटील,प्रिती कोळी,सोनाली पाटील, शांताराम पाटील,भुषण पाटील,विठ्ठल पाटील, समाधान पाटील,रविंद्र पाटील, समाधान पांदे,आशा पाटील,शारदा पाटील, उज्वला पाटील,साक्षी पाटील,रितु पाटील, हर्षदा पाटील, पुर्वी पाटील आदि स्री पुरुष कार्यकर्ते व लहान मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
     विठ्ठल पाटील यांच्याकडे झालेल्या कार्यक्रमात सरपंच लिना पाटील यांनी शांता वाणी यांचा सत्कार केला तर संस्थेच्या सर्व सभासदांना गुलाब पुष्प देवून त्यांचाही सत्कार ग्रामस्थां तर्फे करण्यात आला.यावेळी संस्थेच्या कामाची माहिती शांता वाणी यांनी करुन दिली.सरपंच व विठ्ठल पाटील यांचा संस्थे तर्फे शाल गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.यावेळी विठ्ठल पाटील यांनी गावातील एकी आणि कामकाजाची माहिती देवून झाडे जगविण्याची हमी दिली. शेवटी हेमलता कुलकर्णी यांनी सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!