कारंजा प्रतिनिधी.
कारंजा शहरातील आशा सेविकेच्या जागा काढून रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा – विनोद नंदागवळी
तालुका आरोग्य विभागाच्या अंतर्गत येत असणारे ताज नगर, लीलावती प्लॉट, लेंडीतलाव या ठिकाणच्या जागा रद्द केल्या आहे, जागा रद्द करण्याचे कारण नेमकं काय आहे? कुठे पाणी मुरत आहे? एक आशा सेविका सुरेखा गोजे कडे १० हजार लोकसंख्या असलेल्या परिसरामध्ये एक आशा सेविका ड्युटी करण्याचे कारण काय? कारंजा शहरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. आशा सेविका सुरेखा गोजे यांची ड्युटी नेमाने रंगारी पुरा येथे आहे, परंतु ताज नगर लीलावती प्लॉट या परिसरात ड्युटी कोणाच्या आदेशाने काम करते? याचा खुलासा करण्यात यावा, अशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली आहे.
वरिष्ठ तसेच सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत सुविधा असताना डिलिव्हरी पेशंट महिला कडून दोन हजार रुपये घेत असल्याचा प्रकार समोर येत आहे, त्याची चौकशी करून दोषी असणाऱ्या आशा सेविका व अधिकाऱ्यावर कारवाई करावी. आता आरोग्य विभागातर्फे काय कारवाई होते, या कडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.
तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष झालेल्या कारंजा तालुक्यातील आरोग्य विभागाकडे प्रशासन लक्ष देणार का? तालुका आरोग्य अधिकारी गेली कित्येक वर्षे कारंजा तालुक्यात कार्यरत आहेत, प्रशासकीय नियमानुसार ३ वर्षे एका ठिकाणी सेवा झाल्यानंतर प्रशासकीय बदली होत असते. मग तालुका आरोग्य अधिकारी यांची बदली का झाली नाही? हा एक अनुत्तरित प्रश्नच आहे. तसाच काहीसा प्रकार आशा सेविका यांचा देखील आहे. वर्शोंवर्ष झाले आशा सेविका एकाच परिसरात कार्यरत आहेत, त्यांचे परिसर देखील बदलण्यात यायला हवे होते, मात्र तसे झालेले दिसून येत नाही. असे काही प्रशासकीय जिल्हा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांचे मत आहे.
