तालुक्यामध्ये चर्चेला उधाण
कारंजा प्रतिनिधी
कारंजा मानोरा मतदार संघाच्या आमदार सईताई डहाके यांनी दिनांक 21 -5 -2025 रोजी स्थानिक शेतकरी निवास येथे तालुकास्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मध्ये खेड्यापाड्याच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली, परंतु नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल आमदार सईताई डहाके व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याकडून नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई केली नाही.
तसेच भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात विनोद नंदागवळी पत्रकार यांनी दिनांक 14 -5 – 2025 रोजी तहसील कार्यालय कारंजा येथे आमरण उपोषण विनोद नंदागवळी पत्रकार यानी सुरू केले आहे. आमदार, खासदार यांनी जिल्हाधिकारी मॅडम वाशिम, मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम, राज्य शुल्क उत्पादन शुल्क अधिकारी वाशिम, जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम या निष्क्रिय अधिकाऱ्यांनी आमरण उपोषण कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष केले आहे, कारण जनतेच्या मनात प्रश्न पडलेला आहे की दुर्लक्ष करण्याचे कारण काय?
भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत आहे किंवा वरिष्ठ अधिकारी हे सुद्धा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याच्या सोबत भ्रष्टाचार मध्ये सामील तर नाही ना अशी चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे.
जनता दरबार शिबिरामध्ये नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर आमदार सईताई डाहाके यांच्याकडून नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याचे आदेश न मिळाल्यामुळे तक्रार करणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे निरसन झालेले नाही, त्यामुळेच नागरिकांचे समाधान न झाल्याचे तालुक्यामध्ये चर्चेला उधान आले आहे.
