मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
आज बुधवार दि. ०७/०५/२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता ताडहदगावंच्या मुसा भद्रायणी नदीचे मा. उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण आणि सरपंच श्रीमती शारदा प्रकाश वाघमारे यांच्या हस्ते नदी खोलीकरणाला सुरुवात झाली.

समस्त महाजन ट्रस्ट, मुंबई यांच्या कडून मोफत मिळालेले पोकलेन्ड मध्ये नदीच्या कडेला असलेले शेतकरी आणि गावातील दानशूर ग्रामस्थांच्या वर्गणी तून डिझेल टाकून नदी चे काम करण्यात येत आहे.
अंबड – घनसावंगी रोडवरील पुलाखाली ताडहदगांव मधील ग्रामस्थ परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून शुभारंभ करण्यात आले.

नदी वर कोणाचाही हक्क नाही. नदी स्वच्छता, खोलीकरण रुंदीकरणाला अडथळा निर्माण होणार नाही काम बंद पडणारं नाही याची काळजीघ्या असा सल्ला श्री विजय चव्हाण यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले. तसेच ताडहदगावं ग्रामस्थांचे कौतुक करुन अभिनंदन केले.
सरपंच श्रीमती शारदा वाघमारे, श्री कृष्णा वाघुंडे आणि श्री भीमाशंकर वाघुंडे यांनी पाण्याचे महत्व पटवून सहकार्य करण्याची विनंती केली.
याप्रसंगी श्री बापूराव हरिश्चंद्र, श्री किशोर दत्तात्रय वाघुंडे, श्री परमेश्वर वाघुंडे, श्री भीमाशंकर वाघुंडे, श्री कृष्णा वाघुंडे, प्रकाश वाघमारे, श्री दत्ता नारायण जामकर, श्री दिगंबर वाघुंडे, श्री चंद्रकांत वाघुंडे, श्री दीपक हरिश्चंद्रे, श्री बंडू टेकाळे, श्री राजाराम खंडागळे, श्री अनिल डवले आणि श्री देवा चित्राल यांची उपस्थिती होती.
