जळगांव प्रतिनिधी

जितेंद्र अरूण चांगरे प्रो.प्रा.सुविधा सॅनिटेशन सर्व्हिसेस, जळगांव यांचा जाहीर खुलासा…

आमची फर्म सुविधा सॅनिटेशन सर्व्हिसेसला जळगांव येथील नविन बस स्थानकावरील प्रसाधन गृह बांधणे व दुरूस्ती देखभाल सह प्रसाधन गृहात पैसे द्या व वापर करा. या तत्वावर प्रसाधन गृह चालविण्याचे काम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 30 वर्षाच्या कालावधीसाठी दिलेले आहे. सदर प्रसाधन गृहात पुरूष व स्त्री कामगार नेहमी सेवेत उपस्थीत असतात. तसेच बसस्थानकातील अधिकाऱ्यांचे योग्य सुचना, आदेश व योग्य त्या मार्गदर्शनाचे उपस्थित असलेल्या स्त्री व पुरूष कर्मचारी यांच्या वतीने तंतोतंत पालन करण्यात येते. तसेच आमच्या सुविधा प्रसाधन गृहात महिलांना व 12 वर्षातील आतील मुलांना तसेच दिव्यांगांना मोफत सेवा दिली जाते. तसेच आमच्या सुरू असलेल्या प्रसाधन गृहाच्या किरकोळ दुरूस्तीला 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असल्याने आमच्या सुविधा प्रसाधन गृहात किरकोळ व मोठ्या दुरूस्तीचे काम तसेच आतील व बाहेरील परिसर सुशोभिकरणाचे काम सुरू असून प्रसाधन गृहात काम करत असलेल्या स्त्री कामगार यांना दुपारी 1 ते 3 भोजन अवकाश (जेवणाची सुट्टी) देण्यात येते. असे असतांनाही गेल्या काही दिवसापासून आमच्या व्यवस्थीत व समाधानकारकरित्या सुरू असलेल्या प्रसाधना गृहाबाबत आमचे प्रतिस्पर्धी ठेकेदार (कॉन्ट्रॅक्टर) काही ना काही कुरघोड्या करून तसेच त्यांच्या विश्वासातल्या स्थानिक महिलांना संगनमत व कटकारस्थान करून पैसे देण्याचे बनाव करून आमच्या प्रसाधनगृहाबाबत लोकशाहीचे चौथे स्तंभ असलेल्या दैनिक वृत्तपत्र चे पत्रकार बांधवांना आमच्याबद्दल खोटी माहिती तसेच तक्रारी करण्याचे प्रकार सुरू केलेले आहे. तसेच नेहमी आमच्या प्रसाधन गृहाबद्दल बातमी देतांना दरवेळेस बातमी मध्ये हे आवर्जुन लिहीले जाते की, ठेक्याची मुदत संपुनही पैसे वसुल होत असतील तर हा प्रकार गंभीर आहे. तसेच या प्रकरणाबद्दल एस.टी.महामंडळ दुर्लक्ष करीत आहे. सदर आमच्या सुरू असलेल्या कामाबद्दल किंवा आम्ही प्रवाशांना देत असलेल्या सेवा सुविधांबद्दल जर कोण्या प्रवाशाला किंवा महिला भगिनींना काही तक्रार किंवा काही त्रास असेल तर ते नविन बसस्थानकातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांजवळ तक्रार न करता थेट पत्रकार बांधव व वृत्तपत्रातच का आमच्या बद्दल अशा प्रकारच्या बातम्या प्रसिध्दीस दिल्या जातात. सदर आमची फर्म सुविधा सॅनिटेशन सर्व्हिसेसशी एस. टी. महामंडळाने केलेल्या करारनामच्या अंमलबजावणी दि. 18/01/1996 पासून ते दि. 18/01/2026 पर्यंत आमच्या सुरू असलेल्या प्रसाधन गृह ठेक्याची मुदत अस्तित्वात असून आम्हाला आमची प्रसाधन गृहाची पुढील मुदतवाढ मिळू नये, तसेच आमच्या संस्थेच्या वतीने नविन बसस्थानकाच्या बाहेरील जागेवर ज.श.म.ना.पा च्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत असलेल्या निधीतून जे आधुनिक व वातानुकूलीत शौचालय बनविण्यात आलेले आहे. त्याच्या सुध्दा निविदा प्रक्रियेत आमची फर्म तसेच आमची संस्था शिवसुगंध मेहतर वाल्मिकी बहुउद्देशीय संस्था यांनी भाग घेतलेला असून आम्हाला व आमच्या संस्थांना या निविदा प्रक्रियेतून कसे बाहेर करता येईल व अशा खोट्या नाट्या तक्रारी करून आमच्या फर्मची बदनामी करून आम्हाला पुढील मुदतवाढ न मिळणेस त्यांना कशी सोयीचे होईल व आमची फर्म तसेच आमची संस्था काळ्या यादी कशा जातील याचे नेहमीच कटकारस्थान आमचे प्रतिस्पर्धी ठेकेदार सुडबुध्दी व आकासाने संगनमत करून त्यांचे हे प्रकार राजरोज सुरूच आहे.

सदर महापालिकेच्या या नविन बसस्थानकाच्या बाहेरील नव्याने बनविण्यात आलेल्या आधुनिक व वातानुकूलीत शौचालय स्वच्छता गृह, स्थान गृह पैसे द्या व वापर या तत्वावर खाजगी संस्थेस देखभाल दुरूस्तीसह चालविण्याकामीची निविदा दि. 11 फेब्रु. 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. जळगांव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा एक ठराविक लाडका मक्तेदार (ठेकेदार) त्याने दिलेल्या आरोग्य विभागास पत्रावरून निविदा प्रक्रियेतील तांत्रिक अट त्याच्या म्हणण्याप्रमाणे निविदा प्रक्रियेत समाविष्ठ करण्यात येते त्याचा विरोध म्हणून आम्ही त्या निविदा प्रक्रियेची हरकत घेतली व ती अट शिथील करून महापालीकेच्या अरोग्य विभागास सुधारीत नविन निविदा प्रक्रिया करण्यात भाग पाडले, त्या गोष्टीचा राग देखील या मक्तेदाराला आमच्याबद्दल असेलच. तरी आपण आमच्या विरूध्द आलेल्या तक्रारी याची कोणत्याही प्रकारची कारवाई करतांना या संदर्भात आपण सविस्तर चौकशी करूनच काय तो निर्णय घ्यावा. तसेच अनुसूचीत जातीपैकी एका अत्यंत अशा उपेक्षीत मेहतर वाल्मिकी समाजास न्याय द्यावा अशी आपणास कळकळीची विनंती. सदर खुलाश्याची प्रत मा. जिल्हाधिकारी साहेब, जळगांव. मा. पोलिस अधीक्षक साहेब, जळगांव. मा. आगर व्यवस्थापक, जळगांव. मा. बस स्थानक प्रमुख, जळगांव. यांना पुढील कार्यवाही साठी देण्यात आलेली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!