विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

शिरपूर : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात असलेली अवैध बिअरची वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिरपूर पथकाने उधळून लावली. मुंबई-आग्रा महामार्गावरील वरला-सांगवी रोडवर सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत ५ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने वरला-सांगवी रोडवर नाकाबंदी केली होती. यावेळी संशयास्पदरीत्या येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारची तपासणी केली असता, त्यात बिअरचे बॉक्स आढळून आले. या कारवाईत १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे माऊंट स्ट्रॉन्ग बिअरचे ४० बॉक्स, ५०० मिली क्षमतेचे एकूण ९६० बिअरचे टीन जप्त करण्यात आले. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ४ लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कारही ताब्यात घेण्यात आली.

याप्रकरणी वाहनचालक राहुल कैलास पनवार आणि संजय सायमल पावरा या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई निरीक्षक देविदास नेहूल, दुय्यम निरीक्षक पी. पी. तायडे व त्यांच्या पथकाने केली.

दरम्यान, मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीच्या प्रकारांना या कारवाईमुळे पुन्हा एकदा चाप बसला आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!