नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी जितू जयस्वाल
पी.एम.श्री. स्कूल जवाहर नवोदय विद्यालय श्रावणी नंदुरबार – 2 द्वारा श्रावणी या गावात सामाजिक जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य श्री.पी. आर . कोसे यांनी भूषविले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सरपंच श्री.मोणीका संदीप कोकणी लाभले तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री.भाईदास कोकणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सादरीकरण विद्यालयाचे इयत्ता 6 वी ते 11 वी चे विद्यार्थ्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्व नाटय अभियानातून पटवून दिले त्यानंतर विद्यार्थ्यांनी लहान मुलांना मोबाईल पासून दूर कसे ठेवले जाईल तसेच मोबाईलचे दुष्परिणाम हा संदेश नाटकाच्या माध्यमातून दिला. समाजात सामाजिक जागरूकता वाढावी म्हणून झाडे लावा झाडे जगवा, समाजाला लागलेल्या वाईट सवयी दारू, गुटखा, सिगारेट, स्वच्छतेचे महत्व या विषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी हा संदेश दिला.विविध प्रकारचे जनजागृती वर आधारित गीत, नृत्य, वगैरे सादरीकरण करून जनमानसात जनजागृती व्हावी हा संदेश दिला.
माननीय प्राचार्य श्री.पलक कोसे सर यांनी आपल्या भाषणातून सर्व लोकांनी एकत्रीत येऊन समाजप्रबोधनाचे कार्य करणे काळाची गरज आहे. समाजाने आरोग्य जपावे, स्वच्छ रहावे मोबाईल योग्य त्या वेळी वापरावा, व्यसनमुक्त समाज निर्माण करावा असा संदेश दिला.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन 9 वी च्या विद्यार्थ्यांनीनी केले तसेच विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक श्री. ए.एस.पागृत यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सी. के.गावित यांनी केले.
