(नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी जितू जयस्वाल)
नवापूर शहरातील आई देव मोगरा माता पदयात्रा समिती दरवर्षी पदयात्रा काढत असते
यंदा 11व्या वर्षी नवापूर येथून निघालेल्या पदयात्रेचे शनिवारी सकाळी 10 वाजता खांडबारा गावात आगमन झाले. त्याप्रसंगी त्यांच्या गावात ग्रामपंचायत परिसरात स्वागत करण्यात आले.यावेळी गावातील सरपंच अविनाश गावित, उपसरपंच योगेश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते, गणेश पाडवी, बबलू शर्मा, राजु नाईक, अनिल शर्मा, तुळशीराम नायका, तारकेश्वरी नाईक, सागर पाडवी, बहादुर सिंग वळवी, अजय नाईक, आर्यन पाडवी, वीरेंद्र ईशी, मनोज चौधरी, जितु जयस्वाल, आकेश वसावे, अनुपम परदेशी, शशिकांत शिंदे, याहा मोगी माता भक्त गन मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रा पुढे शेगवे, वेडापावला, आरोडीतारा, धानोरा, कुकरमुंडा, अक्कलकुवा, खापर मार्गे सांगबारा याहा मोगी माता मंदीरावर पोहोचणार आहे.
